दीपिका-जोश्‍ना जोडीचे उत्साहात स्वागत 

चेन्नई – भारताच्या आघाडीच्या स्क्‍वॅश खेळाडू तसेच 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुहेरी रौप्यपदक विजेत्या जोश्‍ना चिनप्पा आणि दीपिका पल्लीकल यांचे आज मायदेशी आगमन झाले, तेव्हा त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
दीपिका-जोश्‍ना जोडीचा राष्ट्रकुल स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने त्यांना यावेळी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर दीपिकाने सौरव घोषच्या साथीत मिश्र दुहेरीत ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले. त्यामुळे स्पर्धेत भारताने स्क्‍वॅशमध्ये दोन रौप्यपदकांची कमाई केली. दीपिका-जोश्‍ना जोडीने ग्लासगो-2014 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.

या वेळी मात्र त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याबद्दल जोश्‍ना म्हणाली की, 2014 नंतर स्क्‍वॅशमध्ये अनेक बदल झाले आहेत. आम्ही त्यात सामील झालो होतो आणि आमचे या स्पर्धेतही सुवर्णपदकाचेच लक्ष्य होते. आम्ही दुर्दैवाने त्यात अपयशी ठरलो. मात्र आमची स्पर्धेतील कामगिरी समाधानकारक असून आम्ही आता आशियायी स्पर्धेत आणखी चांगल्या कामगिरीसाठी उत्सुक आहोत. दीपिका म्हणाली की, स्पर्धेतील आमची कामगिरी समाधानकारक असली, तरी आम्हाला पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. माझ्या या मताशी स्पर्धेतील न्यूझीलंडचे खेळाडू देखील सहमत असून पंचांनी त्यांच्या कामगिरीत खूपच सुधारणा करण्याची गरज होती. दरम्यान तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानिस्वामी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंसाठी रोख पारितोषिकांची घोषणा केली असून त्यानुसार जोश्‍ना चिनाप्पा व सौरव घोषाल यांना प्रत्येकी 30 लाख, तर दीपिका पल्लीकलला 60 लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)