दीपिकासोबत लग्नविषयावर रणवीरचे पहिल्यांदाच भाष्य

बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यांच्या लग्नाच्या तारखेपासून ते डेस्टिनेशन वेडिंगपर्यंत सर्वच बातम्या माध्यमांमध्ये सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. परंतु, विवाहाविषयी रणवीर-दीपिकाने कधीच उघडपणे जाहीर केले नाही. मात्र, लग्नाच्या चर्चेवर रणवीर दीपिकाने एका कार्यक्रमात चुप्पी तोडली आहे.

तुमचे लग्न कधी आहे, असा प्रश्न विचारताच रणवीरने लगेच उत्तर दिले कि, कुठे, कसे, कधी हे सर्वच तुम्ही माध्यमांमधून वाचत आहात. माझ्या शेरवानीचा रंग, लग्नाची तयारी, पाहुण्यांची यादी सर्वच तर बातम्यांद्वारे वाचत आहात. शिवाय, मलाही माझ्या लग्नविषयी बातम्यांमधूनच कळाले, असे मिश्किल उत्तर त्याने दिले. रणवीरचे हे उत्तर ऐकून उपस्थितांना हसू अनावर झाले. रणवीर पुढे म्हणाला, माझ्या लग्नाविषयी मी स्वतः सर्वात आधी माहिती माध्यमांना देईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी दीपिकाही रणवीरसोबतच होती.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup: Thumbs up
8 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)