दीपिकाने रणवीरसाठी रणबीरचा टॅटू नाहीच हटवला

दीपिका आणि रणवीर सिंह यांचा बहुचर्चित विवाह एकदाचा संपन्न झाला. या विवाहाची छायाचित्रे प्रसिद्ध होताच त्यातील बारकाव्यांची चर्चाही जोरात सुरू झाली आहे. दीपिका आणि रणवीरचा पहिला रिसेप्शन सोहळा बंगळुरूला पार पडला. यावेळी दीपिका माध्यमानाच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. परंतु, या फोटोंवरून एका वेगळाच विषयाची चर्चा सुरु झाली ती म्हणजे दीपिकाच्या ‘आरके टॅटू’ची.

रणवीर सिंहशी प्रेम करण्याअगोदर दीपिकाने रणबीर कपूरशी प्रेम केले होते. रणबीरसाठी तिने आपल्या मानेच्या मागे “आरके’ नावाचा टॅटू देखील बनवला होता. पण पुढे रणबीर आणि दीपिकामध्ये ब्रेक अप झाला. याच काळात दीपिकाचा हात पकडला रणवीर सिंहने. रणवीरशी प्रेम केल्यानंतर देखील दीपिकाच्या मानेवर तो टॅटू होता, पण तो आता दिसत नव्हता. दीपिका वेंडिंग रिसेप्शनसाठी बेंगळुरूकडे रवाना झाली. तेव्हाच टॅटू गायब झाल्याचे लक्षात आले होते. मागील अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये दीपिकाने आरकेचा टॅटू हटविल्याच्या चर्चा होत्या. परंतु, आता पुन्हा एकदा हा टॅटू दिसून आला आहे. बंगळुरूकडून मुंबईला रवाना होताना आरकेचा हा टॅटू कॅमेरात कैद झाला.

दरम्यान, याआधीही अनेक वेळा दीपिकाचा आरके टॅटू गायब झाल्याचे निदर्शनास आले होते. अनेक जाहिरातींसाठी तिने मेकअपनेही टॅटू लपवला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)