दीपिकाच्या मते रणवीर “ममाज बॉय’

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या विवाहाचा मुहूर्त निश्‍चित झाला आहे. आता लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. अशातच दीपिकाने रणवीरबाबतचे आपले एक खास मत व्यक्‍त केले आहे. त्यावरून तिला रणवीरबाबतची ही खास गोष्ट विशेष आवडत नाही, असे लक्षात आले आहे.

“कॉफी विथ करण’मध्ये अलीकडेच दीपिका आणि आलिया भट या दोघीजणी गेस्ट म्हणून आल्या होत्या. करण जोहरने त्याच्या स्टाईलमध्ये या दोघींशी भरपूर गप्पा मारल्या. दोघींच्या भावी वैवाहिक आयुष्याबाबतच्या कल्पना काय आहेत, हेही विचारले. आलियाने रणबीर कपूरबाबत आणि दीपिकानेही रणवीर सिंहबाबत खूप मोकळेपणाने आपली मते व्यक्‍त केली. या शो दरम्यान करणने दोघींना रॅपिड फायर प्रश्‍नांचा भडिमार केला. आपला जोडीदार कसा असेल, असे तुम्हाला वाटते असे त्याने विचारले. एका शब्दात उत्तर देणे अपेक्षित असल्याने दीपिकानेही एकाच शब्दात सांगितले, रणवीर हा “ममाज बॉय’ आहे आणि तसाच राहील. यावरूनच रणवीरबाबतचे तिचे निरीक्षण आणि अंदाजही लक्षात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रणवीरची लाइफस्टाईल आपल्याला समजलेलीच नाही. पण तरीही त्याच्याशी जुळवून घेईल, असेही दीपिकाने सांगितले. कारण इमोशनल लेव्हलवर तो अगदी चांगला माणूस आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे एकीकडे दीपिका रणवीरबरोबर लग्नाची तयारी करते आहे. तर दुसरीकडे लग्नानंतर एक्‍स बॉयफ्रेंड रणबीर कपूरबरोबर रोमॅंटिक सिनेमाही करणार आहे.

रणबीर आणि दीपिकाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे लव्ह रंजनच्या आगामी कॉमेडी सिनेमात हे दोघे एकत्र असण्याची शक्‍यता आहे. अजय देवगणच्या प्रॉडक्‍शनच्या या सिनेमात स्वतः अजयही असणार आहे. पुढील वर्षी याचे शूटिंग सुरू होईल आणि 2020 पर्यंत हा सिनेमा रिलीज होईल. रणबीर आणि दीपिका यांच्यात ब्रेक अप होऊन बराच काळ लोटला आहे. दोघांनी आपापले जोडीदार निवडले आहेत. आता ते दोघेही पुन्हा चांगले मित्र झाले आहेत. त्यामुळे या जोडीला पुन्हा पडद्यावर बघायला सगळ्यांना आवडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)