दीपिकाच्या कामाचे नितू आणि ऋषी कपूर यांनी केले कौतुक

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांचा पद्मावत सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिली आहे. तीव्र विरोधानंतरही सिनेमाचे शो अनेक ठिकाणी हाऊसफुल होत आहेत. प्रक्षेकांकडून कलाकारांचे कौतुक तर होत आहेच. मात्र याचे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही कौतुक केले आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर रणबीर कपूरचे आई-वडिलांनी म्हणजेच नितू आणि ऋषी कपूर यांनी दीपिकाच्या उत्कृष्ट कामाबद्दल शुभेच्छा म्हणून फुलांचा गुच्छ पाठवला. यासोबत त्यांनी तिचे कौतुक करणारी एक चिठ्ठीही पाठवली. आम्हाला तुझा अभिमान वाटतो. नितू आणि ऋषी कपूरकडून तुला खूप सारे प्रेम. दीपिकाही त्यांना धन्यवाद बोलायला विसरली नाही. दीपिकाने तो फुलांचा गुच्छ आणि चिठ्ठीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)