दीपा कर्माकरचा आठवडाभरात सरावाला प्रारंभ

नवी दिल्ली: भारताची अव्वल जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आगामी दोहा जागतिक जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेसाठी येत्या आठवडाभरात सरावाला प्रारंभ करणार आहे. आशियाई स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे दीपावर सध्या उपचार सुरू असून तिचा पुनर्वसन कार्यक्रम येत्या आठवडाभरात संपेल अशी अपेक्षा आहे.

इंडोनेशियातील आशियाई स्पर्धेतील आर्टिस्टिक टीम फायनलसाठी सराव करीत असताना दीपाच्या गुडघ्याच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले होते. त्यामुळे तिने या प्रकारातून माघार घेतली होती. दरम्यान बॅलन्स बीम स्पर्धेत ती सहभागी झाली होती. परंतु तिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आपल्या प्रशिक्षकांसह दीपा गेल्याच आठवड्यांत मायदेशी परतली होती व तिची एमआरआय चाचणीही घेण्यात आली होती.

त्यानंतर दीपावर फिजिओथेरपी सुरू करण्यात आली होती. वैद्यकीय उपचार व फिजिओथेरपी या सर्व प्रयत्नांना यश येत असून दोहा येथे 25 ऑक्‍टोबरपासून रंगणाऱ्या जागतिक जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेत ती सहभागी होऊ शकेल, असा विश्‍वास दीपाचे प्रशिक्षक विश्‍वेश्‍वर नंदी यांनी व्यक्‍त केला. दीपाची दुखापत गंभीर नसून त्यातून ती पूर्णपणे बरी आणि तंदुरुस्त होऊ शकेल, असेही नंदी यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे दिल्लीतील रुग्णालयाने एमआरआय चाचणीसाठी दीपाकडून कोणतेही शुल्क घेतले नसल्याची माहितीही त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)