दीपवीर लग्नासाठी इटलीला रवाना

मुंबई – बॉलिवूडची चर्चेत असलेली जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या विवाहाची चर्चा गेल्या 6 महिन्यांपासून रंगते आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी दीपिकाने लग्नाची पत्रिका सोशल मिडीयावर शेअर केली होती. दोन दिवसानंतर 13 आणि 15 नोव्हेंबरला दीपिक आणि रणवीर लग्न करणार आहे. हा लग्न सोहळा इटलीत होणार असून लग्नासाठी रणवीर आणि दीपिका इटलीला जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर बघितले जात आहे.

दरम्यान, रणवीर – दीपिका त्यांच्या कुटुंबीयांसोबत शुक्रवारी मध्यरात्री रवाना झाले. निघताना मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर चाहत्यांच्या शुभेच्छांचाही त्यांनी स्वीकार केला. इटलीतील लेक कोमोमध्ये 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान रणवीर-दीपिकाचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. तसेच बंगळुरु येथे 23 नोव्हेंबरला भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)