दीपविर मुंबईला परतले 

बॉलीवूडमधील हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा 14-15 नोव्हेंबरला इटलीत शाही लग्नसोहळा पार पडल्यानंतर ते मुंबईला परतले आहेत. “दीपवीर’ खारमधल्या दीपिकाच्या घरात गृहप्रवेश करत आहेत. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती.

यावेळी रणवीर-दीपिका दोघांच्याही चेह-यावर आनंद दिसून येत होता. त्यांच्या चेह-यावरील चमक आणि हास्य सर्वांची मने जिंकून घेत होती. यावेळी रणवीरने गुलाबी रंगाचे जॅकेट, तर दीपिकाने ड्रेसवर लाल चुनरी घेतली आहे. दीपिकाने लावलेले सिंदूर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचे फोटो खूपच व्हायरल होत आहेत.

-Ads-

मुंबई विमानतळावर रणवीर-दीपिकाने सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे अभिवादन स्वीकारले. त्यानंतर रणवीर दीपिकाला घेवून घराकडे रवाना झाला. आता दीपिकाच्या घरी दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तेथून ते बंगळूरूला जाणार असल्याचे समजते. बंगळूरूवरून आल्यावर 28 नोव्हेंबरला मुंबईत रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांनी वरळीतील नव्या घरी दीपिका-रणवीर शिफ्ट होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)