दीपक मानकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

पुणे- महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार कारवाई केलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी हा आदेश दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांनी 2 जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हंटले होते. त्यानुसार मानकर यांच्यासह नऊजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यातील सात जणांना अटक करण्यात आली होती. तर, बांधकाम व्यवसायिक सुधीर कर्नाटकी यांना उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. प्रथम सत्र, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मानकर यांचा जामीन फेटाळला होता. त्यावेळी 10 दिवसाच्या पोलिसांकडे शरण जाण्याचा आदेश मानकर यांना न्यायालयाने दिला होता. त्यानुसार ते पोलिसांकडे हजर राहिले. न्यायालयाने त्यांना 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, पोलीस कोठडीतच छातीत दुखत लागल्याने त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. तब्बेत सुधारल्याने शुक्रवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)