दीनानाथमधील जादुटोणाप्रकरणाची चौकशी रखडली

प्रकरणाला साडेतीन महिने पूर्ण : चौकशी समितीचीही केवळ एक बैठक

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.27 – पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात मांत्रिकाकरवी जादुटोणा करण्याच्या प्रकाराला साडेतीन महिने पूर्ण झाले तरीही अद्याप त्याचा तपास पूर्ण झालेला नाही. ससूनतर्फे नेमण्यात आलेल्या समितीची केवळ एक बैठक झाली असून ही चौकशी पूर्ण होण्यासाठी अजून बराच कालावधी लागणार असल्याचे समोर येते आहे.

पोलिसांकडून आम्हाला पत्र प्राप्त झाले असून पोलिसांनी आम्हाला वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे का, याची तपासणी करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. आतापर्यंत समितीची एक बैठक झाली असून आणखी काही कागदपत्रांची आवश्‍यता असल्याने आम्ही पोलिसांना ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची चौकशी कागपत्रे आल्यानंतर पुढे सरकेल.
– डॉ. अजय तावरे, वैद्यकीय अधिक्षक व समितीचीे अध्यक्ष, ससून सर्वोपचार रुग्णालय

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संध्या गणेश सोनवणे (वय 24, रा. दत्तवाडी, सिंहगड रोड) या महिलेचा 11 मार्चला एरंडवण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. संध्या यांच्या छातीमध्ये दुधाच्या गाठी झाल्याने त्या उपचार घेत होत्या. यानंतर संध्या यांचा भाऊ महेश जगताप यांनी रुग्णालयाबाहेरील खासगी डॉक्‍टर डॉ. सतीश चव्हाण याने दीनानाथच्या आयसीयुमध्ये मांत्रिक बोलावून मंत्र-तंत्र व उतारा केल्याचा व्हिडिओच दाखवून एकच खळबळ उडवून दिली होती. मांत्रिक प्रकरणावरून बरेच वादंग निर्माण झाले होते. तसेच नातेवाईकांनी मांत्रिक आणि त्याला घेऊन येणारा डॉक्‍टर सतीश चव्हाण यांच्याविरुध्द अलंकार पोलीस ठाण्यात जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या एकूणच प्रकरणात काही वैद्यकीय निष्काळजीपणा झाला का, हे शोधून काढण्याची जबाबदारी पालिकेच्या आरोग्य विभागाने स्विकारली होती. त्यानंतर या एकूणच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ससूनच्या डॉक्‍टरांची समिती नेमण्यात आली होती. मात्र आतापर्यंत या समितीची केवळ एक बैठक झाली असल्याचे समोर आले आहे.

आरोग्य विभाग म्हणतो..
पालिका आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले की, दीनानाथ रुग्णालयातील प्रकारणात आम्ही डॉक्‍टर, नर्स, ऑफिसबॉय यांची चौकशी करून अहवाल उपसंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. मात्र त्या अहवालात कोणताही निष्कर्ष न काढल्याचे सांगत तो अहवाल आम्हाला पुन्हा पाठविण्यात आला. पालिकेकडे सखोल चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टर नाहीत. त्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्‍टरांना याची चौकशी करण्याची विनंती केली आहे. मात्र त्यांनी याबाबत अद्याप आम्हाला काहीही कळविलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)