दीड हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात

सातारा-  विहीर पाणी हक्काची नोंद घेऊन तसा सातबारा उतारा देण्यासाठी दीड हजार रुपयाची लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी दोन वाजता वडले, ता. फलटण येथील तलाठी दत्तात्रय रामचंद्र धुमाळ हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

तक्रारदार यांच्या पत्नीने विहीर पाणी हक्काचे कायम खूशखरेदीखत केले होते. त्याची नोंद घेऊन तसा सातबारा देण्यासाठी तलाठी दत्तात्रय रामचंद्र धुमाळ (वय 40 , रा. अक्षता रेसिडन्सी, जाधववाडी, ता. फलटण) याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली होती.

-Ads-

तलाठ्याने लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला यांच्या पथकाने फलटण शहरातील गजानन चौकात सापळा रचला. त्यानंतर तक्रारीची खात्री केली. त्यानंतर दुपारी तक्रारदाराकडून तडजोडीअंती दीड हजार रुपयाची लाच स्वीकारून सातबारा दिला. त्यावेळी तलाठी धुमाळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. लाचखोर तलाठ्याच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)