दीड वर्षात निळवंडेचे पाणी शेतात : खासदार लोखंडे

निळवंडेला केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाल्याबद्दल लोखंडे यांचा सर्वपक्षीय सत्कार
रांजणगाव देशमुख  – 2014 च्या निवडणुकीच्या वेळी मला लोकांनी गावात येण्यास अडवले. परंतु आता तुम्ही स्वतःहून मला सत्कारासाठी आमंत्रित केले. निळवंडेचा प्रश्‍न आता पूर्णपणे सुटला असून कालव्यांची कामे सुरू झाली आहेत. आपल्या शेतात दीड वर्षाच्या आत पाणी येणार आहे. साईबाबांच्या नावाने व जलआयोगाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आपला प्रश्‍न मिटला आहे.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडेसाठी कृती समितीच्या मदतीने केंद्रातून 2 हजार 232 कोटी खर्चाला मान्यता आणल्यामुळे त्यांचा रांजणगाव देशमुख (ता. कोपरगाव) ग्रामस्थांच्या वतीने सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुंजा खालकर होते.
यावेळी निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर वर्पे, गंगाधर गमे, सुकलाल गांगवे आदींची भाषणे झाली. यावेळी खासदार लोखंडेंसह समितीच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य इल्हे, सरपंच संदीप रणधीर, माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे, माजी सरपंच अत्याभाऊ वर्पे, अनिल खालकर, संपत खालकर, सोमनाथ खालकर, गजानन मते, योगेश चव्हाण, सचिन खालकर, रावसाहेब गोर्डे, दत्ता भालेराव, पराग खंडीझोड, श्रीकांत मापारी, अरुण ठोंबरे, धनंजय वर्पे, संजय गोर्डे, ज्ञानदेव चव्हाण, तुषार काथे, शिवाजी वामन, बाळासाहेब घोरपडे, उत्तम घोरपडे, बाळासाहेब धाकतोडे, विक्रम ठोंबरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)