दीड वर्षाच्या चिमुकलीची अग्निशमन दलाकडून सुटका

पुणे – खेळत- खेळत घराच्या बाथरुमध्ये गेलेली दीड वर्षांची मुलगी दरवाजा लॉक झाल्याने अडकून पडली. यानंतर घाबरलेल्या पालकांनी मुलीला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन जवानांना पाचारण केले. अथक प्रयत्नानंतर खिडकीच्या सहाय्याने एकाला आत सोडून दरवाजा उघडून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. ही घटना कोंढवा खुर्द परिसरात दुपारी दोनच्या सुमारास घडली.

कोंढवा येथील अग्निशमन केंद्राशेजारीच “ईझी’ सोसायटी आहे. येथे दुसऱ्या मजल्यावर राहण्यास असलेल्या फ्लॅटमधील ही मुलगी बाथरुममध्ये गेली. यावेळी दरवाजाचा लॅच लॉक झाल्याने दरवाजा बंद झाला. सोसायटीशेजारी अग्निशमन केंद्र असल्याने पालकांनी संपर्क साधला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यानंतर दोन जवानांनी तत्काळ घरी येऊन मदतकार्य केले. यावेळी उपस्थित असलेल्या कारपेंटरकडील ड्रीलच्या सहाय्याने दरवाजाला होलही पाडण्यात आले. तसेच, एकाला खिडकीतून आत सोडून दरवाजा उघडण्याचे सांगितले. दीड तासानंतर मुलगी सुखरुप बाहेर काढण्यात आले. यावेळी मुलीच्या पालकांनी अग्निशमन दल जवानांचे आभार मानले. जवान सुभाष खाडे, रवी बारटक्के, विकास ठाकरे, अक्षय गायकवाड आदींनी या मुलीच्या सुटेकसाठी प्रयत्न केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)