दीड महिन्यानंतर ही नवविवाहितेचा शोध लागेना

वाल्हे – सासवड शहरातून प्रेम विवाह केलेल्या नवविवाहितेचे सख्या भावाने अपहरण केल्याच्या घटनेला एक महिना उलटला तरी अजूनही पोलिसांना तिचा शोध लागला नाही. नवविवाहितेच्या परिवाराकडून पतिला जीवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या जात आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पतीने लावला आहे.
मूळचे रोमणवाडी पांडेश्वरचे राहणारे प्रशांत विलास रोमण (वय 26) हे पुण्यात नोकरी करत असताना त्यांची श्‍वेता राजेश शुक्‍ला (रा. कोंढवा ब्रुद्रुक) यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व त्यांनी 12 मे 2018 रोजी लग्न केले. त्यानंतर दोन्हे सासवड येथे व्यावसाय निमित्त राहण्यास आले. अनेक वेळा श्‍वेता हीचे परिवारातील सदस्यांशी मोबाईलवर बोलणे होत असे.
30 जून रोजी मुलीला भाऊ विकास राजेश शुक्‍ला हा भेटण्यास सासवडला आला होता. त्यांनी प्रशांत सह त्याची आई व भाची यांच्याशी चर्चा केली व परत जात असताना रस्त्यापर्यंत सोडण्यास चल असे सांगून श्‍वेताला बाहेर बोलविले. यावेळी तिच्यासोबत प्रशांतची भाची प्राजक्ता मुळिक ही पण होती. यावेळी रस्त्यावर अचानक एक गाडील आली. त्यामध्ये शुक्‍ला यांचा लहान भाऊ अनुज व अन्य दोन तरूण होते. त्यांनी श्‍वेताचे तोंड दाबून गाडीत बसवले. यावेळी मदतीसाठी गेलेल्या प्राजक्ताला मारहाण करून ढकलून दिले.
याबाबत प्रशांत रोमण यांनी सासवड पोलीस स्टेशनला खबर दिली. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्याऐवजी तुझ्यावरच मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल होईल असे सांगून त्याला माघारी पाठविले. परंतु प्रशांतने घटनेचे चित्रीकरण दाखविल्यानंतर 1 जुर्ले रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला गेला. परंतु, गुन्हा दाखल होउन एक महिना लोटला तरीही अजूनही श्‍वेताचा शोध लागला नाही.
या विषयी प्रशांत रोमन यांनी सांगितले कि, पोलिसांनी अजूनपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. अजून तपासाची प्रक्रिया पूर्ण केली नसून या घटनेचा तपास हवालदार काळभोर करीत आहेत. मुलीचे मामा बिपीन मिश्रा हे फोन वरून धमक्‍या देत आहेत.
या विषयी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मुगूटराव पाटिल यांनी सांगितले कि, हवालदार आर. काळभोर या घटनेचा तपास करीत आहेत. चौकशीसाठी मुलीच्या मामांना बोलावून घेण्याचे आदेश दिले आहेत. विमानतळाविरोधात आंदोलन सुरू असल्यामुळे मी त्याठिकाणी आहे. मुलीचा शोध घेण्याचे आम्ही प्रयत्न करीत आहोत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)