दीड महिन्यात महाराष्ट्रात 13 नवे पासपोर्ट सेवा केंद्र

नवी दिल्ली – येत्या दीड महिन्यांत महाराष्ट्रात 13 नवे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे.

देशातील नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने “पासपोर्ट आपल्या दारी’ या तत्वानुसार पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी 2017 मध्ये देशभरात 251 पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रात 7, तर देशभरात 173 पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. दुसऱ्या टप्प्याअखेर येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रात 13 केंद्रांसह देशभरात 251 पासपोर्ट सेवा केंद्रांचे उद्दिष्ट्‌य पूर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

“पासपोर्ट आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत राज्यात 13 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. ही केंद्र लवकरच कार्यान्वीत होणार आहेत. ही केंद्र सिंधुदुर्ग, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सातारा, बीड, मुंबई नॉर्थ-सेंट्रल, मुंबई साऊथ- सेंट्रल, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड आणि जळगावचा समावेश आहे.

जानेवारी 2017 पासून सुरु झालेल्या देशव्यापी कार्यक्रमानुसार एप्रिल 2018 अखेरपर्यंत दोन टप्प्यात एकूण 251 पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहेत. या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत वर्धा, जालना, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)