दीड तोळ्याचे मंगळसूत्र लंपास

पिंपरी – पायी चालत जाणाऱ्या महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मोशीमध्ये घडली.

आशा चंद्रशेखर चल्लापल्ली (वय-23, रा. संतनगर, मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा या त्यांच्या मुलाला घेऊन घरी पायी चालत जात होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जवळ येत गळ्यातील दीड तोळ्याचे 45 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)