दीड एकर बाजरीतून साठ हजारांचा नफा

बेल्हे- बोरी बुद्रूक (ता. जुन्नर) येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात घेतलेल्या पावसाळी बाजरी पिकातून चांगल्या प्रकारचा नफा मिळणार, असा आशावाद केला जात आहे. बाजरीच्या पिकाच्या मशागतीसाठी त्यांना केवळ फक्त पाच हजार रूपये खर्च आला आहे.
जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात पावसाळी बाजरीचे पीक बोरी बुद्रूक (ता. जुन्नर) येथील सुनील बबन पाटील या शेतकऱ्याने अतीशय नियोजन पध्दतीने घेतले आहे. जाधव यांनी सुरुवातीला त्यांच्याकडे असलेल्या दीड एकर क्षेत्रात बाजरीचे पीक घेण्याचे ठरवले. त्यानुसार या दीड एकर क्षेत्रात पहिल्यांदा घेतलेला ऊस तुटून गेल्यानंतर त्यांनी शेतात शेणखत टाकून नांगरणी केली. त्यानंतर पंधरा दिवस शेततापू दिले आणि त्यानंतर शेतात रोटर मारले आणि निर्मल जातीच्या दोन दोन किलोचे चार किलो बियाणे हाताने शेतात टाकले आणि ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने पाणी देण्यासाठी सार पाडले.
दीड एकरात असलेल्या बाजरी पीक आता चांगल्या स्वरूपात आले असून, विशेष म्हणजे त्यांनी कुठल्याही प्रकारची औषध फवारणी केलेली नाही. या पिकाला ठिबक सिंचनद्वारे पाणी दिले असून, आता हे पीक काढणीला आले आहे. त्यांना बाजरीच्या पिकाच्या मशागतीसाठी केवळ पाच हजार रुपये खर्च आला असून, या पिकातून आता पस्तीस ते चाळीस (क्विंटल) पोती भरणार असून, त्यांना किमान साठ हजार रुपयांचा नफा होईल, असा अंदाज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)