दीड एकर ज्वारीचे पिक पक्ष्यांसाठी सोडले

तळेगावचे शेतकरी भुजबळ यांची सामाजिक बांधिलकी

तळेगाव ढमढेरे- उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने चाऱ्याची व पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत आहे. त्यातच पक्षासाठी चारा – पाणी मिळणे अगदीच कठीण जात आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून तळेगाव ढमढेरे परिसरातील प्रगतशील शेतकरी राजेंद्र गोविंद भुजबळ व घनश्‍याम प्रकाश तोडकर यांनी दीड एकरातील ज्वारीचे बहरलेले पिक पक्षांसाठी राखून ठेवले आहे.

उन्हाळ्यात पक्षांना चारा, पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ज्वारी, बाजरीवर पक्षी येऊ नयेत म्हणून शेतकरी वेगवेगळ्या युक्‍ती लढवितात. विविध उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे पक्षांना अन्न मिळवणे मुश्‍किल ठरते. या सर्व बाबींचा विचार करून भुजबळ व तोडकर कुटुंबीयांनी ज्वारीची कणसे भरात आलेली असताना हे दीड एकरातील पिक पक्षांसाठी सोडले आहे. त्यामुळे पक्षांना मुक्‍त संचार करून याठिकाणी अन्न मिळण्याची त्यांनी सोय केली आहे.

पक्षांना पाणी मिळावे म्हणून शेतामध्ये तसेच घराच्या परिसरात व गच्चीवर ठिकठिकाणी पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करणार असून हा उपक्रम दरवर्षी राबवणार असल्याचेही यावेळी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)