दीडहजार अमेरिकन नागरिकांना साडेदहा लाखांना गंडा

खराडीत चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा


राजस्थानात ‘कनेक्‍शन’, दोघांना अटक; एक जण फरार

पुणे – अॅपलचे बोगस टेक सपोर्टच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा सायबर सेलच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या पथकाने या टोळीच्या खराडी येथील हायप्रोफाईल आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा टाकून ही धडक कारवाई केली.

असा चालायचा गोरखधंदा 
आदित्य काळे आणि रोहित माथूर यांचे खराडी येथील फाऊंटन रस्त्यावरील सिटी विस्टा या अलिशान इमारतीत ‘व्ही टेक सोल्युशन’ हे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर असून काळे आणि माथूर हे दोघेजण हे कॉल सेंटर भागीदारीत चालवितात. हे दोघे आणि त्यांचा जयपूर येथील साथीदारा फतवानी हे अमेरिकेतील नागरिकांना त्यांच्या ‘अॅपल मोबाइल आणि आयपॅडवर वापरण्यात येणाऱ्या सफारी ब्राऊझरवर जनरेट करुन त्यांचे डिवाईस क्रॅश झाले असून ही समस्या सोडवून देऊ’ अशी बतावणी करत होते, त्याद्वारे त्यांना अॅपल आय ट्यून कार्ड खरेदी करण्यास भाग पाडून या भामट्यांनी गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत या नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. अशा प्रकारे त्यांनी या कालावधीत तब्बल दीड हजार अमेरिकन नागरिकांना गंडा घालत त्यांची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या कारवाईत सायबर सेलच्या पथकाने दोघांना अटक केली आहे, तर त्यांचा आणखी एक साथीदार पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके राजस्थान येथील जयपूर येथे रवाना करण्यात आली आहेत. या टोळीकडून सहा हार्डडिस्क, एक लॅपटॉप, वायफाय राऊटर आणि पाच हेडसेट असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळीने अशा प्रकारचे असे गुन्हे केल्याची शक्‍यता आहे, त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. 11 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रोहित रामलाल माथूर (वय 29, रा. 102, रामनगर कॉलनी, बावधन) आणि आदित्य सदानंद काळे (वय 29, रा. 515, सिटी व्हिस्टा, फाऊंटन रोड, खराडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार कुणाल फतवानी (रा. जयपूर, राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद यांनी यासंदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सायबर सेलचे पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद आणि सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरची माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने याठिकाणी छापा टाकून या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा आणि या टोळीचा पर्दाफाश केला. पोलीस निरीक्षक गजानन पवार, सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस उपनिरीक्षक किरण औटे, सोनाली फटांगरे, पोलीस कर्मचारी राजकुमार जाबा, प्रसाद पोतदार, अनिल पुंडलिक, संतोष जाधव, मितेश शेलार, शिरीष गावडे, शुभांगी मालुसरे, शीतल वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)