दि विश्वेश्वर सहकारी बॅंकेकडून 10 टक्‍के लाभांश

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे: दि विश्वेश्वर सहकारी बॅंक लि., पुणे ची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

या प्रसंगी बोलताना बॅंकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांनी सांगितले की, मार्च 2018 अखेर बॅंकेच्या ठेवी रुपये 1539 कोटी असून कर्जे रुपये 811 कोटी आहेत. एकूण व्यवसाय रुपये 2350 कोटी झाला आहे. बॅंकेचा सीआरएआर 18.49 टक्के असून बॅंकेचा सकल नफा रुपये 35.73 कोटी आहे. बॅंकेने वर्ष 2017-18 साठी सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर केला. तसेच जाहीर केलेला लाभांश बॅंकेने त्याच दिवशी सर्व सभासदांच्या खात्यात जमा देखील केला.

-Ads-

गाडवे यांनी पुढे सांगितले की, चालू आर्थिक वर्षात गतवर्षीच्या तुलनेत अधिक चांगली व्यवसाय वाढ व सर्वोत्तम वसुली करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. रिझर्व्ह बॅंकेने प्रत्येक बॅंकेत विद्यमान संचालक मंडळाव्यतिरिक्त जादा व्यवस्थापक मंडळ नेमण्याचे सूतोवाच केले आहे. या गोष्टीला सहकार क्षेत्राने आपला विरोध नोंदविला असल्याचे त्यांनी सभासदांना सांगितले. विश्वेश्वर बॅंक मुख्यतः गरीब व गरजू लोकांना आर्थिक मदत करीत असते. त्या दृष्टीने आपण लवकरच महिलांच्या बचत गटांना कर्ज देण्याची विशेष योजना सुरू करीत असल्याची घोषणा त्यांनी केली.

बॅंक लवकरच काही निवडक शाखांमध्ये कॅश स्वीकारून एटीएमसारखे पेमेंट करणारे रिसायकल मशीन ग्राहकांच्या सेवेत दाखल करणार आहे. यापुढील काळात इंटरनेट बॅंकिंग सुविधा सुरू करण्याचा बॅंकेचा प्रयत्न राहील. ग्राहकांना लवकरच शाखांमध्ये लाईट बिल, टेलिफोन बिल इ. भरण्याची सुविधा बॅंक उपलब्ध करून देणार आहे.

या सभेत बॅंकेचे ज्येष्ठ संचालक सुनिल रुकारी व बॅंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी उपस्थितांना या क्षेत्रातील घडामोडीवर उपयोगी मार्गदर्शन केले.
वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा आणि विविध क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष राजेंद्र मिरजे यांनी कृतज्ञता व्यक्‍त केली.

विश्वेश्वर बॅंक गरीब व गरजू लोकांना मदत करते. त्यादृष्टीने लवकरच महिला बचत गटांना कर्ज देण्याची विशेष योजना सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बॅंकेचा अधुनिकरणावर भर असून बॅंक लवकरच रिसायकल मशीन ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करणार आहे. इंटरनेट बॅंकिंगवर अगामी काळात भर देण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना विविध बिले भरता येतील.
-अनिल गाढवे
अध्यक्ष, दि. विश्वेश्वर सहकारी बॅंक

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)