“दिशा’ समिती बैठकीला खातेप्रमुखांची “दांडी’

अनुपस्थित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्याबरोबरच होणार कारवाई


काही विभाग प्रमुखांनी बैठकीस पाठविले दुय्यम अधिकाऱ्यांना

पुणे – केंद्र शासनाच्या विविद योजनांचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे “दिशा’ समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विविध विभागांच्या प्रमुखांनी उपस्थित राहाणे आवश्‍यक असताना बहुतेक खातेप्रमुख या बैठकीकडे फिरकलेच नाही तर काहींनी दुय्यम अधिकाऱ्यांना या बैठकीस पाठविले.

यामुळे या समितीचे अध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही बैठक स्थगित केली. अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून खुलसा मागविण्याबरोबरच त्यांचावर कारवाई करण्याची सूचना आढळराव पाटील यांनी यावेळी दिली. तसेच या बैठकीविषयी अधिकाऱ्यांच्या अनास्थेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री यांना पत्र लिहून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र शासनाच्या 40 पेक्षा अधिक योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ज्येष्ठ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “दिशा’ समितीची बैठक होते. त्यानुसार शुक्रवारी या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र एखाद दुसरा अपवाद वगळता सर्वच खात्यांच्या विभागप्रमुखांनी या बैठकीकडे पाठ फिरविली; तर काही विभागांचे दुय्यम अधिकारी उपस्थित राहिले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, वनविभाग, बीएसएनएल, स्मार्ट सिटी अशा अनेक महत्त्वपूर्ण खात्यांचे अधिकारी अनुपस्थित होते.

केंद्र सरकार जनतेसाठी चांगल्या योजना राबवीत असताना अधिकाऱ्यांच्या स्तरावर गांभीर्य नसल्याचे गंभीर दखल घेण्यात येणार असल्याचे खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले. केंद्रशासनाला त्याबाबत रीतसर कळवून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस दिशा समितीचे सचिव तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांना केली.

अधिकारी ही बैठक गांभीर्याने घेत नसल्याने खासदार आढळराव पाटील यांनी संताप व्यक्त केला. हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. या बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुरेश गोरे आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते; तर इतर आमदारांनी दुर्लक्ष केले असून जनतेच्या कामांबाबत लोकप्रतिनिधींची ही अनास्था पाहून आपल्याला खंत वाटल्याची भावना आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)