दिशा वकानीने शेअर केला मुलीचा पहिला फोटो

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेतून घरा घरात पोहचलेली दया बेन म्हणजचेच दिशा वकानी आई झाली. तिला गोंडस मुलगी झाली. तिने आपल्या छकुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

१७ सप्टेंबरला दिशाने ‘तारक मेहता..’चा शेवटचा भाग शूट केला होता. त्यानंतर दया काही महिने या मालिकेपासून दूर राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. कारण तिच्या आयुष्यात आता एक छोटी परी अवतरली आहे. दिशाने हीरानंदानी मुलीला जन्म दिला. गेल्याच वर्षी दिशाने चार्टेड अकाऊंटट मयूर पांड्या सोबत विवाह केला होता. हे त्या दोघांचे पहिलेच बाळ आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, गरोदरपणामुळे शो पासून लांब असलेल्या दिशाबद्दल काही अफवा पसरल्या होत्या. तिला शोमधून काढण्यात आले, असे बोलले जात होते. परंतु, कालांतराने या अफवा असल्याचे स्पष्ट झाले. दिशाने टीव्ही शो ‘खिचडी’मध्ये पाहुणे कलाकार म्हणून उपस्थिती लावली होती. मात्र ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील दया बेनने अगदी सर्वांच्या मनावर राज्य केले. याव्यतिरीक्त ती ‘देवदास’ ‘जोधा-अकबर’ आणि ‘लव स्टोरी २०५०’ या चित्रपटात देखील झळकली होती.

https://instagram.com/p/BkVMLtogGvj/?utm_source=ig_embed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)