दिशा पटानीने शेअर केला रक्षाबंधन संबंधी व्हिडिओ

“बागी-2′ चित्रपटापासून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री दिशा पटानीने रक्षाबंधन संबधी एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम खात्यावर शेअर केला आहे. खरे तर ही एका प्रॉडक्‍टची जाहिरात आहे. यामध्ये ती आपल्या लहान भावासोबत रक्षाबंधन साजरा करत आहे आणि त्याला विशेष भेटवस्तू देखील देत आहे.

या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच ती सांगते, माझा भाऊ माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे मी त्याची दीदी, मैत्रीण आणि आई देखील आहे. मागील काही वेळा कामामुळे आम्हाला एकत्र रक्षाबंधन साजरा करता आला नाही. परंतु यावेळी मी माझी सर्व कामे बाजूला ठेवत वेळ काढला आहे. त्यानंतर ती त्याच्या लहानपणीचा फोटो काढते आणि त्याच प्रकारचा ड्रेस त्याच्या भावाला घालायला देते. लहानपणी त्याची एक आवडती खुर्ची असते त्याच प्रकारची खुर्ची ती त्याला भेट म्हणून देते.

दरम्यान, दिशा सोबत टायगर श्रॉफचे नाव जोडले जाते. त्याच्या प्रेमासंबंधाच्या चर्चा बॉलीवूडमध्ये नेहमीच होत असतात. परंतु, दोघांनी देखील यावर कोणतीही कबुली दिलेले नाही. सलमान खानच्या आगामी “भारत’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहे. कतरीना कैफ देखील यात प्रमुख भूमिका साकारणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)