दिशासोबत हृतिकने केले फ्लर्ट?

अभिनेता हृतिक रोशन याने टायगर श्रॉफची गर्लफ्रेण्ड दिशा पटानीसोबत फ्लर्ट केल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगत आहे. ही बाब मीडियामध्ये प्रसारित झाल्यानंतर हृतिकने हे वृत्त छापणाऱ्या वेबसाईटवर तोंडसुख घेतले. दिशा पटानीनेही हे वृत्त फेटाळत हृतिकला क्‍लीन चिट दिली.

दिशा पटानी लवकरच हृतिक रोशनसोबत नव्या चित्रपटात झळकणार आहे. आता हृतिकला आदर्श आणि सल्लागार मानणाऱ्या टायगर श्रॉफनेही या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. मुंबईत एका उत्पादनाच्या लॉन्च सोहळ्यात टायगरने यावर त्याने भाष्य केले. टायगर म्हणाला, हे या इंडस्ट्रीचा पार्ट अँड पार्सल आहे. ही केवळ हृतिकची गोष्ट नाही. प्रत्येक कलाकाराला अशाप्रकारच्या घटनांमधून जावे लागत आहे. जेव्हा तुम्ही लाईमलाईटमध्ये असता, तेव्हा सगळ्यांसाठी तुम्ही एक सोपे लक्ष्य बनता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र ही अतिशय बालिश अफवा आहे. मी दोघांना (हृतिक आणि दिशा) चांगल्याप्रकारे ओळखतो, असेही टायगरने सांगितले.

दरम्यान, टायगर श्रॉफ यशराजच्या आगामी चित्रपटात हृतिक रोशनसोबत काम करणार आहे. यावर टायगर म्हणाला की, “माझ्यासाठी हे स्वप्न सत्यात उतरल्यासारख आहे. मी हृतिकचा एक अभिनेता, एक माणूस म्हणून मी त्याचा खूप आदर करतो. ती त्याचा मोठा चाहता आहे. त्याच्याकडून बरंच काही शिकायला मिळेल. या चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्‍टोबरपासून सुरु होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)