#दिशादर्शक

विजेन्द्र 

मित्रांनो, जेव्हा आपण आपला मार्ग ठरवून चालायला सुरुवात करतो, त्यानुसार कष्टही घेत असतो तेव्हा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी, “प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच घडेल असे कधी होत नाही. न कळत का होईना अडीअडचणी या येतच असतात. त्यावर उत्तर शोधणं, त्यातून बाहेर पडून पुढे मार्ग सुरू ठेवणे हे आपले काम असते आणि या अडचणी माणूस स्वरुपातही येऊ शकतात. यासाठी मित्र करा अथवा ओळखी वाढवा पण समोरच्याला ओळखा. आजच्याजगात खोटे पण गोड बोलून काम साधणारे खूपच आहेत. त्यांना काय त्यांचे काम साधले बास, तुमचे काय याकडे त्यांना काही देणं-घेणं नसतं.

याबाबतचं ताजच उदाहरण सांगतो. अर्थात ते मित्र नाही तर भाऊ होते. यातील मोठ्या भावाने त्याच्या आईला खूप काही अगदी एकत्र कुटुंब असे स्वप्न दाखवले. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून आईने आहे तो फ्लॅट विकून ती दुसऱ्या मोठ्या फ्लॅटची वाट बघू लागली. लहान भाऊ या विरोधात असूनही हे सारे घडले होते. तो बोलला… तसे वागला का? नाही! तो फोर व्हिलर-टू व्हिलर भाड्याने फ्लॅट असे स्वतःचे आयुष्य सुरू करून हे “मी कष्टाने कमावले’ असे लोकांना सांगत-मिरवत हिंडू लागला. पण आज त्याची आई वृद्धाश्रमात राहते तर लहान भाऊ पत्र्याच्या शेडमध्ये.

अशी ही दुनिया आहे. आपण आपला मार्ग ठरवून व्यवस्थित वाटचाल करायचे ठरवतो, पण त्यात अडी-अडचणी या येतच असतात. असे नाही की कायम आपल्याला वाईटच स्वतःचा फायदा घेणारी माणसे भेटतील. काही असेही असतात जे स्वतःला त्रास सोसूनही दुसऱ्याच्या हितासाठी झटतात, तसे सल्लेही देतात. मात्र ते लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. त्यावर विचार केला पाहिजे. यासाठी आपली वाटचाल जशी व्यवस्थित तसे मनही शांत पाहिजे. येथे सारासार विचार हा प्रमुख आहे हे कधीच विसरू नका! 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)