#दिशादर्शक: राजकारण…? 

– विजेन्द्र 
खरं तर हा लिहायचा विषय होऊ शकतो का? हाचं मोठा प्रश्‍न आहे. कारण आज प्रत्येक पक्षाचा नेता असो वा अजून कोणी.. बोलत चालले आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्यात, मात करण्यात, समोरच्याला कमीपणा देण्यात ते कमीपणा करत नाहीत. अगदी मग यात मातब्बर नेतेमंडळी असोत वा त्यांचे समर्थक. ते त्यांचे काम करतच आहेत आणि हे सारे काही ना काही मार्गाने आपल्या समोर येत असते. याचा अर्थ असाही नाही की या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करावे. कारण एखादा नेता जेव्हा त्याच्या भाषणात आवेशाने खूप काही बोलून जातो तेव्हा त्याला सावरायला एक वरचा माणूस असतो. याबाबत अजित पवार आणि शरद पवार हे तर ताजे उदाहरण आहे. राज ठाकरेही बराच काळ शांत राहिले, पण आज त्यांनी परत भाषण देणे सुरू केले. त्याला गर्दीही होते. मात्र, ही भाषणं येणाऱ्या निवडणुकांसाठी आहेत हे विसरता येत नाही. मुद्दे तेचं असतात. मग आजपर्यंत यात बदल का नाही झाला? प्रश्‍न पडतोचं ना? राजकारण हे बहुधा असेचं असते. जेथे दोन चेहरे असतात. मत मागणारा वेगळा आणि जर निवडून आले तर मदत मागायला जा… तसेच सांगितले जाईल “माझ्या सचिवाला भेटून सांगा’. कारण यांच्याकडे वेळ कधीच नसतो. केरळला आपला पगार मदतनिधी म्हणून देऊन यांनी काय मोठे कार्य केले? जेव्हा समाजातील अनेक संस्था, कंपनी वगैरेंनी ते कार्य केले तेव्हा हे जागे झाले होते का? साधा प्रश्‍न. कारण तुम्ही स्वत:ला समाजाला धरून त्यांची काळजी घेताय असे दाखवायचे का? नक्‍की करायचे तरी काय?

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)