दिशादर्शक फलक नसल्याने अपघातांचा धोका

सातारा-पंढरपूर चौपदरीकरणात ठेकेदारांचा निष्काळजीपणा

गोंदवले – सातारा-पंढरपूर या रस्त्याची कामे मोठ्या युद्धपातळीवर सुरू असून कुठेही दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताचा धोका आहे. बुधवारच्या गोंदवलेतील घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार आहे का, निष्काळजी ठेकेदारांवर कारवाई होणार का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सातारा टेंभुर्णी पंढरपूर रस्ता रुंद करण्यासाठी काही ठेकेदारांना पाच किमी टप्प्या-टप्प्याने काम दिली आहेत. यामध्ये रस्ता रुंद करण्यासाठी त्याच्याजवळची झाडे काढण्यापासून कामाना सुरूवात झाली. सध्या दोन ट्रॅक पैकी एक ट्रक बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे. सुरुवातीला कच्चे सिमेंट क्रॉंक्रिटिकर करून त्यावर पक्के काम करण्यात येते आहे. बुधवारी गोंदवले खुर्द येथे काम सुरू असताना डंपर उच्चवाहिनीच्या तारेला चिकटून टायरने पेट घेतला. यावेळी 11 के व्ही विद्युत तारेचा खांब तुटला असता तर अनर्थ घडला.

ठेकेदारांनी कात करताना विद्युत वितरण कार्यालयाकडून रितसर परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र. तसेही काहीही झाल्याचे दिसत आहे. पाच किमी अंतरात अनेक नवीन पूल बांधकाम, वळण रस्ता, धोकादायक ठिकाणी कसलेही सूचना फलक नाहीत. ठिकठिकाणी रस्त्याच्या मधोमध अचानक मुरूमाचे ढिगारे टाकण्यात येतात. या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीचा रस्ता अरुंद होत आहे. रात्रीचा प्रवास करताना खूप अडचणी येत आहेत. मुरुमाचे ढीग वाहचालकांच्या लक्षात येत नाहीत. शीलवंत वस्ती नजीक एक मुख्य वीज वाहिनीचा खांब रस्त्याच्या मधोमध असून ती काळ्या रंगाचा असल्याने रात्रीचा दिसत नाही. त्याला किमान रेडियम लावण्यात आला तर दृष्टीस पडायला सोपं जाईल. प्रांताधिकारी, तहसीलदार आदींनी यात लक्ष घालून ठेकेदारांना सक्त सूचना देणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)