दिव्या स्पंदनाविरोधात देशद्रोहाची केस

पंतप्रधानांबाबत केले आक्षेपार्ह ट्‌विट

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या माजी खासदार आणि सोशल मीडिया सेल संयोजक दिव्या स्पंदन यांच्या विरोधात देशद्रोहाची केस दाखल करण्यात आली आहे.दिव्या स्पंदना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्‌विट केल्याबद्दल गोमतीनगर (उत्तर प्रदेश) येथे त्यांच्या विरोधात लखनौचे वकील सैयद रिझवान अहमद यांनी ही केस दाखल केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिव्या स्पंदना यांनी केलेले ट्विट अवमानकारक आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. देशाच्य सार्वभौमत्वाचे प्रतीक आहेत. त्यांच्याबद्दल असे ट्विट करणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही याबाबत एफआयआर दाखल केला आहे असे रिझवान यांनी सांगितले आहे.

मंगळवारी रिझवान यांच्या तक्रारीवरून दिव्या स्पंदना यांच्या विरोधात देशद्रोह आणि आयटी कायद्यांतर्गत केस दाखल करण्यात आली असून ती तपासासाठी सायबर सेलकडे पाठवण्यात आली आहे.

सोमवारी दिव्या स्पंदना यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट करून आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याबाबत लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त करून दिव्या स्पंदना यांना ट्रोल केले होते. दिव्या स्पंदना यांनी यापूर्वीही नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्‌विट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)