दिव्यात बुलेट ट्रेनला गावकऱ्यांचा विरोध

ठाणे – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सध्या जमीन संपादन करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिव्यातील नागरिकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला आहे.

या प्रकल्पासाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या सुमारे 108 गावांमधील जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. धक्कादायक म्हणजे ज्यांची जमीन या प्रकल्पासाठी संपादित होणार आहे, त्यांना न विचारताच प्रशासनाने त्या जमिनीचे सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यामुळेच सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामारे जावे लागते आहे.

सरकारकडून बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहण करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोजदाद करण्यात आली आहे. मात्र हे सर्व करताना ज्यांची जमीन अधिग्रहण करणार त्यांनाच सरकार आणि प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांना विश्वासात न घेता थेट सर्व्हे सुरु केला. त्यामुळेच स्थानिकांसह शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दर्शविला आहे.

दिवा येथील आगासान, पडले, देसई, म्हातर्डी या गावातील जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंतर्गत येणार आहे. ही जमीन शेतीसाठीही वापरली जाते. सुरुवातीला कोकण रेल्वेने यांची जमीन घेतली. याच गावांमधून दोन डीपी रोड जाणार आहेत. ठाणे महापालिकेने 37 एकरची जमीन वेगवेगळ्या कारणासाठी आरक्षित केली आहे. त्यात बुलेट ट्रेनच्या नावाखालीही सरकार जमीन घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. गावकऱ्यांनी मिळून संघर्ष समिती स्थापन केली असून तिच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे लढा सुरु केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)