दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नयेत

तहसीलदार जयश्री आव्हाड : अपंग दिनानिमित्त मतदान ओळखपत्राचे वाटप

वडूज – दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नयेत, तसेच त्यांना मतदार अभियानाचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही अपंग व्यक्तींचा सर्व्हे केला आहे. त्यांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नसल्याचे मत तहसीलदार जयश्री आव्हाड यांनी केले.

जागतिक अपंग (दिव्यांग) दिनानिमित्त तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत्या. यावेळी नायब तहसीलदार कमलाकर भादुले, अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमीन आगा, मंडलाधिकारी विजय खाडे पाटील, प्रताप राऊत, शिवराज पाटील, प्रशांत केंगार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जयश्री आव्हाड म्हणाल्या, दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ निवडणुका, मतदारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी राबवण्यात येणारे उपक्रम व सोयी सुविधा तसेच दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना अपंग दिनानिमित्त मतदान ओळखपत्रांचे वाटप केले. सूत्रसंचालन भरत सानप यांनी केले. एम. बी. चक्के यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)