दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजना : चौगुले

वाई – शासनाच्या पातळीवर अपंग मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आलेली आहे. अपंग मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून त्यांना सोबत्याची सोय करून देण्यात आली आहे. मानवतेच्या पातळीवर समाजाने अपंगाना मायेचा आधार दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील तर त्या आम्ही शासनाच्या पातळीवर विविध योजनांद्वारे सोडविण्यास प्राधान्य देऊ.त्यांना मुख्य प्रवाहात आणू, असे उद्‌गार उपविभागीय अधिकारी-श्रीमती संगिता चौगुले यांनी काढले.

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी उपविभागीय अधिकारी चौगुले बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आय. एफ. पैलवान होते. यावेळी ग्रंथालयाच्यावतीने अपंग विद्यार्थ्यांना दर वर्षी देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा संचाचे उपविभागीय अधिकारी चौगुले व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ. पैलवान, दिव्यांग विद्यार्थी धीरज भोसले, योगेश हिंगमिरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. पी. डी. सुतार यांनी प्रास्ताविक ,प्रा. डॉ. सी. एस. कांबळे यांनी सुत्रसंचालन तर प्रा. डॉ. रमेश वैद्य यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)