दिव्यांग व्यक्तींना मतदानासाठी सुविधा पुरवणार

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार

कोल्हापूर – निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तीना मतदानासाठी आवश्‍यक त्या सर्व सेवा सुविधा पुरविण्यात येतील. त्यासाठी दिव्यांगांची माहिती येत्या 15 दिवसात संकलित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिल्या आहेत.

जिल्हा पातळीवर दिव्यांग व्यक्ती किती आहेत, त्यापैकी किती मतदार आहेत याबाबतची माहिती घेण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. तसेच जिल्हा पातळीवर समिती स्थापन करून दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना बोलवून दिव्यांगांच्या अडचणीबाबत चर्चा करण्याचेही निर्देश दिले आहेत. यास अनुसरून व्यक्तींना सोयी व सुविधा पुरविण्याबाबत नियोजन, अंमलबजावणी, पर्यवेक्षण व मूल्यमापन याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, बीएलओ, ग्रामसेवक यांच्या मदतीने दिव्यांगांची व दिव्यांग मतदारांचे प्रभाग, नोंदणी क्रमांकांची माहिती घेण्यात येत आहे. ब्रेन लिपितून मतदान सुविधा, पोस्टर्स, बॅनर्स आदींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. दिव्यांगांना आवश्‍यकतेनुसार मदतनीस उपलब्ध करून देण्यात येतील. चांगल्या प्रकारची रॅम सुविधाही उपलब्ध करून देण्यात येतील. स्वंयसेवी संस्थांनी दिव्यांग मतदारांची माहिती द्यावी. तसेच 18 वर्षावरील दिव्यांगांची मतदार नोंदणी करावी. जिल्ह्यातील मतीमंद मतदारांसाठी सहाय्यकाबाबत निवडणूक आयोगाचे मागदर्शन घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)