दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक क्षेत्रात विश्‍व विक्रम

पिंपरी- शास्त्रीय, भावगीत आणि चित्रपट गीतांचे सलग पाच तास सादरीकरण करुन चौदा वर्षीय पृथ्वीराज इंगळे या दिव्यांग विद्यार्थ्यांने सांस्कृतिक क्षेत्रात विश्‍व विक्रम केला. कार्यक्रमादरम्यान वर्ल्ड रेकॉडस्‌ इंडियाच्या प्रतिनिधींनी पृथ्वीराजने जागतिक विक्रम केला असून त्याचे 2017-18 या वर्षासाठी “जिनियस रेकॉर्ड’साठी मानांकन करत असल्याचे जाहीर केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव, पं. उपेंद्र भट, भावगीत गायक श्रीकांत पारगावकर, वर्ल्ड रेकॉर्डस्‌ इंडियाचे प्रतिनिधी दिनेश पैठणकर, अनिरूध्द हळदे यांच्या हस्ते पृथीराजचा गौरव करण्यात आला. यावेळी, संतोष राऊत, हिरा दराडे, पृथ्वीराजचे वडील सतीश इंगळे, दया इंगळे, मोहन कुलकर्णी, दत्ता थिटे, गफ्फार मोमीन, राजकुमार सुंठवाल आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर राहुल जाधव म्हणाले, सतीश आणि दया इंगळे या दाम्पत्याने पृथ्वीराज दिव्यांग असूनही खचून न जाता परिश्रम घेतले आणि त्याला घडवले. त्याच्या अंगातील सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळाला आहे. आई ही मुलाची पहिली गुरु असते. याचप्रमाणे त्याची आई या पृथ्वीच्या प्रथम गुरु आहेत. तसेच, त्याची संगीत क्षेत्रातील वाटचाल खूप यशस्वी होणार आहे.

पृथ्वीराजने कार्यक्रमाची सुरूवात राग सारंग ने करत पुढे राग मारूबिहाग सादर केला, नंतर प्रथम तुला वंदितो, विठ्ठला तु वेडा कुंभार, देहाची तिजोरी, आकाशी झेप घेरे पाखरा, हनुमान चालीसा ही भक्ती गीते सादर झाली. शेवटच्या सत्रात आ चल के तुझे, फुलोंका तारोंका सबका कहेना है, मेरी प्यारी बहनीया, मै शायर तो नही, मेरी मॉं, जगजीत सिंह यांची गझल सादर करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)