दिव्यांग फॅनला अमिताभ बच्चन यांच्याकडून ‘खास’ भेट

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांना जेवढी लोकप्रियता मिळाली आहे, तेवढी कोणालाच मिळाली नाही. अमिताभ बच्चन हे देखील ट्‌विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अमिताभ यांच्या घराबाहेर दर रविवारी सकाळी त्यांच्या फॅन्सची गर्दी असते. महानायकाचे एकदा तरी दर्शन घडावे अशी सर्वांचीच अपेक्षा असते.

नुकतेच अमिताभ बच्चन थोड्याशा आजारातून बरे झाले. बरे झाल्यावर प्रथमच घराबाहेर पडलेल्या बच्चन यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्या गर्दीमध्ये एक दिव्यांग युवकही होता. त्याला पायाला व्यंग असल्यामुळे तो खुरडत चालत होता. बच्चन यांना पाहण्यासाठी तो रस्त्याच्या कडेला बसला होता. बच्चन यांनी आपल्या सर्व फॅन्सला नेहमीप्रमाणे अभिवादन केले आणि त्यांची नजर या दिव्यांग फॅनवर गेली. त्यांनी आपल्या सिक्‍युरिटी गार्डला पाठवून या युवकाला घरामध्ये आणले. गार्डनी या युवकाला घरामध्ये आणले आणि बच्चन यांची भेट घडवून आणली.या बच्चन यांनी या युवकाशी हस्तांदोलन करून आस्थेने चौकशी केली. “तुला काय पाहिजे ?’ असे बच्चन यांनी त्याला विचारले पण या असामान्य कलाकाराने दिलेल्या आदरामुळे हा युवक थोडा बावरून गेला होता. त्याने काही बोलायच्या आत बच्चन यांनी त्याला आपल्या कपड्यांची एक बॅग भेट म्हणून दिली. त्यानंतर या युवकाला घरापर्यंत सोडून येण्याची व्यवस्थाही बच्चन यांनी केली. ही सर्व घटना बच्चन यांनी स्वतःच्या ब्लॉगमध्ये लिहीली आहे.
आपल्या ब्लॉगमध्ये वर्णन करताना या युवकाला भेटून आपण थोडे भावनिक झाल्याचे लिहीले आहे. या रविवारी घराबाहेर पडल्यावर एका दिव्यांग फॅनची भेट झाली. पाय अधू असल्याने तो हातांच्या आधारे खुरडत चालत होता. त्यामुळेच हस्तांदोलन केले तेंव्हा त्याचे हात रखरखीत झाल्याचे मला जाणवले. आपल्याला भेटून त्याला खूप आनंद झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला भावनिक झाल्यासारखे वाटते आहे, असे बच्चन यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)