दिव्यांग कल्याण आयुक्तांची बदली रद्द करा

दिव्यांग बांधवानी केले आंदोलन

मंचर- राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालय कार्यालयासमोर आंदोलन करुन शासनाचा निषेध केला. यावेळी जिल्हाधिकारी रामकिशोर नवल यांना लेखी निवेदन देवून बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिव्यांग कल्याण आयुक्तपदी बालाजी मंजुळे यांची नुकतीच नियुक्ती झाली होती. फक्त 50 दिवस जेमतेम त्यांनी काम पाहिले. ते स्वत: दृष्टिहीन आहेत. त्यामुळे त्यांना दिव्यांग बांधवांची समस्या माहित आहेत. त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्यण घेतले होते. त्यांची नंदुरबारच्या जिल्हाधिकारपदी झालेली बदली रद्द करावी म्हणून प्रदेशाध्यक्ष धमेंद्र सातव, दिव्यांग हित, विकास व पुनर्वसनचे दीपक ढोबळे, अभय पवार, महेंद्र निबांळकर, अनिती कदम, रफीक खान, रमेश शिंदे, कैलास तापकीर, जीवन टोपे, सुप्रिया लोखंडे, सुनील शिंदे, अनिता कांबळे, सुनिता बामणे, मृत्यंजय सांवत, संजय पिंगळे, राजू हिरवे, राजू थोरात, बाळासाहेब काळभोर यांनी आंदोलन केले. त्यानंतर बालाजी मंजुळे यांची बदली रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी रामकिशोर नवल यांना निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)