दिव्यांगासाठी 53 लाख रुपये निधी मंजूर

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची माहिती

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील 53 दिव्यांगासाठी दिव्यांग यशवंत घरकुल निवारा योजने अंतर्गत लाभार्थ्यांना 53 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने 5 टक्‍के अपंग पुनर्वसन निधीमधून दिव्यांगासाठी दिव्यांग यशवंत घरकुल निवारा योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत सन 2018-2019 मध्ये आंबेगाव तालुक्‍यातील एकुण 53 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रति लाभार्थी 1 लाख याप्रमाणे एकुण 53 लाभार्थ्यांना 53 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचा तपशील जिल्हा परिषद गटनिहाय पुढीलप्रमाणे – आंमोडी-शिनोली गट 10 लाभार्थी 10 लाख रुपये, घोडेगाव-पेठ गट 15 लाभार्थी 15 लाख रुपये, कळंब-चांडोली गट 9 लाभार्थी 9 लाख रुपये, मंचर-अवसरी खुर्द गट 7 लाभार्थी 7 लाख रुपये, पारगाव-अवसरी बुद्रुक गट 12 लाभार्थी 12 लाख रुपये. एकुण 53 लाभार्थी 53 लाख रुपये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)