दिव्यांगासाठी स्वावलंबन कार्डचे वाटप

कोपरगाव – संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी शासकीय योजनांचा मार्गदर्षन मेळावा शनिवारी पार पडला. भाजपचे प्रांतीक सदस्य विधीज्ञ रविंद्र बोरावके, उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेते रविंद्र पाठक व तालुकाध्यक्ष शरद थोरात, कैलास खैरे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना स्वावलंबन कार्डचे वितरण करण्यात आले. 90 दिव्यांग बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घेतला. प्रारंभी भाजपचे दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकूंद काळे यांनी प्रास्तविक केले. शहराध्यक्ष मुख्तार पठाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यशोधन मल्टीप्लेक्‍सचे संचालक चेतन बागले यांनी दिव्यांग शिष्यवृत्ती प्रवास भाड्यात सवलत, किमान कौशल्य प्रशिक्षण आदी शासकीय योजनांची माहिती दिली. याप्रसंगी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर, नगरसेवक शिवाजी कांडेकर, स्वप्नील निखाडे, रवींद्र रोहमारे, विवेक सोनवणे, माजी संचालक बाळासाहेब नरोडे, व्यापारी नारायण अग्रवाल, भाजपचे माजी शहराध्यक्ष महावीर दगडे, अजिनाथ ढाकणे, दिनेश कांबळे, वैभव गिरमे, रिपाइंचे शहराध्यक्ष भोलानाथ पगारे, करंजीचे उपसरपंच रवींद्र आगवण, सतीश रानोडे, अकबर लाला शेख, फकिर महंमद पहिलवान, आयूब मास्टर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक जयवंत मरसाळे, पंडीत पंडोरे, एस. आर. पवार, पी. एच. वाणी यांनी विषेश परिश्रम घेतले. शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)