दिव्यांगाशी विवाह करणाऱ्यांना एक लाख रुपये

महापालिकेचा निर्णय : जागतिक दिव्यांग दिनापासून होणार अंमलबजावणी

पिंपरी – महापालिकेच्या वतीने अपंग व सव्यंग विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सुदृढ तरूण अथवा तरूणीने दिव्यांगाशी विवाह केल्यास महापालिका त्यांना एक लाख रूपये देण्यात येणार आहेत.

-Ads-

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. येत्या 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून महापालिकेकडून ही अभिनव योजना राबविली जाणार आहे. त्यानुसार एक लाख रूपयांचे सहाय्य संबंधित दाम्पत्याच्या नावावर असलेल्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पाच वर्षानंतर ही रक्कम त्या दाम्पत्याला मिळणार आहे. 2012 नंतर विवाह केलेल्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

यासंदर्भात दिव्यांग कल्याण समिती आणि प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर नुकतीच महापालिकेत बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नागरवस्ती विकास योजना विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य मानव कांबळे, विश्वनाथ वाघमोडे, दत्तात्रय भोसले, परशुराम बसवा, गोपाळ मळेकर आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये दिव्यांगाशी सुदृढ तरूण अथवा तरूणीने विवाह केल्यास 1 लाखांची एफडी थेट बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 40 टक्‍क्‍यांपुढील अपंगत्व असलेल्यांसाठी ही योजना आहे.

विविध कल्याणकारी योजना राबविणार
नागरवस्ती विभागाच्या वतीने महापालिकेच्या सर्व इमारतीमध्ये दिव्यांगासाठी रॅम्प, विशेष प्रकारची शौचालये बांधण्यात येणार आहेत.जन्माला आलेल्या बालकांचे अपंगत्व निदान आणि उपचार त्वरित होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य अपंगत्वाचे निदान येईल. उपचार केले जातील. अपंगत्व येण्यापूर्वीच त्यांना मदत करणे शक्‍य होईल. अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करणे तसेच त्याचे कालबद्ध नियोजन केले जाणार आहे, असल्याची माहिती स्मिता झगडे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)