दिव्यांगांसाठी मोफत हस्तकला प्रशिक्षण

निगडी – महाराष्ट्र शासन अपंग एकात्म शिक्षण योजनेअंतर्गत मॉडर्न हायस्कूल आणि रोटरी क्‍लबच्या संयुक्‍त विद्यमाने कर्णबधिर मुलांसाठी मोफत कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण वर्गाचे उद्‌घाटन रोटरी क्‍लब आकुर्डीच्या अध्यक्षा उज्ज्वला जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपकार्यवाह शरद इनामदार, मुख्याध्यापक गोकुळ कांबळे, माधुरी अंतुरकर, राजीव कुटे आदी उपस्थित होते.

मुलांना यावेळी कला प्रशिक्षण वर्गात विविध प्रकारची ज्वेलरी बनवणे, गणपती रंगवणे, पणत्या सजवणे, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे, कापडी पिशव्या बनवणे आदी कलांचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रशिक्षण वर्गामुळे दिव्यांग मुलांचा सर्वांगीण विकास होईल, असेही ते म्हणाले. प्रशिक्षण वर्गाचे संयोजन कर्णबधिर युनिटच्या प्रमुख कुसुम पाडळे यांनी केले. तर अनुराधा अंबेकर, सुजाता ठोंबरे, मीना अधिकारी, गौरी देशपांडे, सोनिया मांडवकर, मृणालिनी सोनवणे, सविता ममदापुरे, महाले यांनी विविध कलाकृतींचे प्रशिक्षण दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)