दिव्यांगांसाठी महापालिका होणार ‘सुगम्य’

कायमस्वरूपी “रॅम्प’ उभारणी अखेर सुरू

पुणे – महापालिका मुख्य इमारतीत येणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी कायमस्वरूपी “रॅम्प’ उभारणी अखेर सुरू झाली आहे. इमारतीत जाण्यासाठी “रॅम्प’ नसल्याने एक 18 वर्षीय दिव्यांग युवक प्रवेशद्व्राराच्या पायऱ्यांवरून घसरून जखमी झाला होता. ही घटना 16 डिसेंबर 2017 मध्ये घडली होती. या प्रकाराला दैनिक “प्रभात’ने वाचा फोडत प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आणला होता. त्यानंतर तब्बल वर्षभराने का होईना, पण प्रशासनाने ही रॅम्प उभारणी सुरू केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय घडला होता प्रकार
दिव्यांगासाठी “रॅम्प’ नसणे तसेच सुविधांचा लाभ मिळत नसल्याने आयुक्तांना निवेदन देण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे सदस्य 16 डिसेंबर 2017 रोजी महापालिकेत आले होते. बैठक संपल्यानंतर हे सदस्य आयुक्त कार्यालयातून खाली येऊन प्रवेशद्वार पायऱ्यांजवळ आले. तेथील काही सुरक्षा रक्षकांनी दिव्यांगांना खुर्चीवरून खाली सोडले. मात्र, इतरांना चालत जाण्यास सांगण्यात आले. त्यात खडकी येथील राहूल सीताराम मगर हा युवकही पायऱ्यांवरून खाली येत होता. मात्र, तोल गेल्याने तो पडला. सहकाऱ्यांनी त्याला उचलले. मात्र, त्याच्या हाताला जखम झाल्याने रक्तस्राव सुरू झाला. त्यावेळी सोबतच्या दिव्यांग महिलेने त्याला उचलून घेत रक्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला.

तसेच “उपचार करण्यासाठी कोणीतरी पुढे या, प्रथमोपचार पेटी असेल तर द्या,’ अशी विनंती सुरक्षा रक्षकांकडे तसेच बघ्याच्या भूमिकेतील कर्मचाऱ्यांकडे केली. मात्र, त्यांच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही. यावेळी दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीने हा प्रकार पाहिला. त्यानंतर त्या सुरक्षा रक्षकांकडे तसेच या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांकडे “प्रथमोपचार पेटी अथवा या मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी सुविधा आहे की नाही?’ याची विचारणा केली. मात्र, येथे काहीच नसल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार सुरू असतानाच, सह महापालिका आयुक्त माधव देशपांडे प्रवेशद्वाराजवळ आले. “प्रभात’ प्रतिनिधीने त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तत्काळ आपले वाहन या युवकास रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली होती.

…अखेर काम सुरू
ही घटना समोर आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने मुख्य इमारतीसमोरील बाजूस तात्पुरता लाकडी “रॅम्प’ उपलब्ध केला होता. त्याचा वापर वर्षभर सुरू असून त्याचा फायदाही होत आहे. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून हा नवीन “रॅम्प’ उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. अखेर त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन हे काम प्रत्यक्षपणे सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच दिव्यांगांना हा “रॅम्प’ सुरू झाल्यास महापालिकेत प्रवेशासाठी मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)