दिव्यांगांसाठी आर्थिक तरतूद करु

गिरीश बापट: दिव्यांगाची विशेष कार्यशाळा संपन्न
पुणे – एकूण लोकसंख्येच्या तुलनेत विशेष व्यक्‍तींचे प्रमाण हे दहा टकके असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटीबध्द आहे. दिव्यांग व्यक्‍तींसाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करुन देणे सरकारचे काम आहे असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्‍त केले.

अपंग कल्याण आयुक्‍तालय, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, बालकल्याण संस्था व अनाथ संस्थेच्या वतीने अल्पबचत भवन येथे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बापट बोलत होते. यावेळी अपंग कल्याण आयुक्‍त नितिन पाटील, यशदाचे सहप्राध्यापक डॉ.डी.टी.देशमुख, बासरीवादक पंडित केशवजी गिंडे, वसंत ठकार, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

बापट म्हणाले, अपंगत्वावर मात करुन दिव्यांगांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी राज्य शासन तर आहेच मात्र विविध स्वयंसेवी संस्था, शाळा, विविध गटांतील कार्यकर्ते यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी सरकारकडून आम्ही शक्‍य तितकी मदत मिळवून देण्यास पाठपुरावा करु.

नितिन पाटील म्हणाले, दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा शैक्षणिक स्तर वाढण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. संगीत, नृत्य, क्रीडाप्रकारात सहभाग घेतल्याने त्यांची एकूणच ग्रहणक्षमता वाढण्यास मदत होते. यावेळी गिंडे यांच्या बासरीवादनाबरोबरच विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमही सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)