दिव्यांगांसाठीचा निधी खर्च करावा

श्रीरामपूर – तालुक्‍यातील भैरवनाथनगर ग्रामपंचायतीने अपंग पुनर्वसन कायद्याअंतर्गत आजपर्यंत तीन टक्के निधी खर्च केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच दिव्यांगासाठीचा तीन टक्के निधी नियमित खर्च करण्यात यावा, अशी मागणी प्रवीण कोल्हे, शिवाजी दांडगे, राजेश बोरुडे यांनी गटविकास अधिकारी मोहन जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भैरवनाथनगर ग्रामपंचायतीने स्थापनेपासून ते आजतागायत अपंगांसाठी असलेला तीन टक्के निधी खर्च केलेला नाही. अपंग पुनर्वसन कायद्यानुसार अपंगांसाठी हा निधी खर्च करणे आवश्‍यक होते. परंतु ग्रामपंचायतीने तो खर्च केला नाही. सन 2014-15चा सात हजार 900 व 2015-16चा चार हजार 350 असा 12 हजार 250 रुपये अपंगांचा निधी ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारामुळे परत गेला आहे.
अपंगांसाठीचा निधी खर्च केला नसल्यामुळे ग्रामपंचात प्रशासन व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून अपंग पुनर्वसन कायद्यानुसार तीन टक्के निधी नियमित खर्च करण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दांडगे, कोल्हे व बोरुडे यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)