दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावावा : प्रा. शेख

खटाव : शहाजीराजे महाविद्यालयात अपंग दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला.

खटाव, दि. 4 (प्रतिनिधी) – दिव्यांग व्यक्तिने आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर इतरांना देखील मतदानाबाबत जागृत करावे, असे आवाहन प्रा. एम. आय. शेख यांनी खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेद्वारा साजरा केलेल्या जागतिक अपंग दिनाच्या प्रसंगी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संजय पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा.आर. बी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सुहासिनी डेंगळे (बी. एल. वो.), शालन पवार (अंगणवाडी सेविका) या दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान ही करण्यात आला व विद्यार्थांनमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)