दिव्यांगांना पेन्शन वाटपासाठी अपंग दिनाचा मुहूर्त

पिंपरी- शहरातील अपंग व्यक्‍तींना दर महा दोन हजार रुपये पेन्शन सुरु करण्यात आली आहे. येत्या 3 डिसेंबरला अपंग दिनी लाभार्थींना याचा लाभ दिला जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागर वस्ती विकास योजना विभागामार्फत दिव्यांगांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. यामध्ये महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या दिव्यांग व्यक्‍तींसाठी अर्थ सहाय्य (पेन्शन) योजना प्रथमच सुरू करण्यात आली आहे. शहरातील अपंग बांधवांकडून याकरिता अर्ज मागवण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेकरिता आतापर्यंत 2200 अपंगांनी अर्ज केले आहेत. या सर्व प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली असून पात्र लाभार्थींना ही योजना लागू केली जाणार आहे. याशिवाय कागदपत्रांमध्ये त्रूटी आढळलेल्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. याशिवाय आतापर्यंत अर्ज सादर न करू शकलेल्यांचे अर्ज देखील नागर वस्ती विकास विभाग स्वीकारणार आहे.

नागर वस्ती विकास योजना विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत 3 डिसेंबरला दुपारी तीन वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत जागतीक दिव्यांग दिन साजरा करणेत येणार आहे. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व दिव्यांगांसंबंधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांगांचा सत्कार महानगरपालिका करणार आहे. संत गाडगे महाराज-दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी प्रोत्साहनपर अर्थ सहाय्य या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

सुरुवातीला सहा महिन्यांच्या पेन्शनची एकत्रित बारा हजार रुपये रक्कम पात्र लाभार्थींना दिली जाणार आहे. पात्र लाभार्थींच्या खात्यात पेन्शनची रक्कम दर महा जमा करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याला या लाभार्थींच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
स्मिता झगडे
सहाय्यक आयुक्‍त,
नागर वस्ती विकास योजना.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)