दिव्यांगांना कृत्रिम अवयव, साधनांचे मोफत वाटप

पिंपरी – केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सहकार मंत्रालयाच्या सहयोगाने व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 311 दिव्यांगांना शुक्रवारी (दि.25) आकुर्डीत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी येणाऱ्या साडेचार लाख रुपये खर्चाला बुधवारी (दि. 16) झालेल्या स्थायी समितीत ऐनवेळी मान्यता देण्यात आली. आकुर्डी येथील साई उद्यानात 25 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी चार या वेळेत हा साहित्य वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ला यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी खासदार अमर साबळे, बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सहकार मंत्रालयाच्या सहयोगाने दिव्यांगांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे. कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप तसेच राष्ट्रीयकृत बॅंकांच्या वतीने मुद्रा लोनबाबत माहिती व अर्ज वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी साडेचार लाख रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)