दिव्यांगांच्या सुरांनी सजली मैफिल

पिंपळे गुरव – देवी-देवतांची गाणी, सदाबहार हिंदी-मराठी गीतांनी सांगवीकरांना मंत्रमुग्ध केले. ही सायंकाळ सुरांनी सजवली दिव्यांग कलाकांरानी. नवी सांगवी येथील विद्यानगर महिला मंडळातर्फे सामाजिक भावनेने दिव्यांग कलाकारांचा कार्यक्रम आयोजित केला होता. वाघोली येथील राणी लक्ष्मीबाई अंध-अपंग संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला आपल्या सुरांनी रंगत आणली. या कार्यक्रमास नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
नवी सांगवीतील विद्यानगर महिला मंडळातर्फे दरवर्षी अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी मंडळाने उत्सवानिमित्ताने वाघोली येथील राणी लक्ष्मीबाई अंध -अपंग संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या विद्यार्थ्यानी आपल्या सुरेल आवाजात विविध देवतांची गाणी, तसेच मराठी, हिंदी चित्र पटातील गाण्याबरोबरच पोवाडे सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
कार्यक्रमास वास्तुतज्ज्ञ व श्रीगणेश बॅंकेचे संचालक मारुती तरटे, उद्योजक दिलीप पाटील, महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदा अहिरे, उपाध्यक्षा सुनीता घोडके व सर्व महिला सभासद तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर या कलाकार विद्यार्थ्यांसाठी दिलीप पाटील यांच्यावतीने स्नेहभोजन देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)