दिव्यांगांचे सर्व समस्यांचा निपटारा करू

आंबेगाव तालुक्‍याच्या तहसीलदार सुषमा पैकेकरी यांचे आश्‍वासन

मंचर- दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्‍नांचा निपटारा करुन त्यांना सहकार्य केले जाईल. शासकीय योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना देऊन त्यांना उपजिवीकेचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन आंबेगाव तालुक्‍याच्या तहसीलदार सुषमा पैकेकरी यांनी दिले.
अपंग संघटना आंबेगाव तालुका, तहसील कार्यालय व पंचायत समिती आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घोडेगाव येथील पंचायत समिती सभागृहात 58वा जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सुमारे तीनशे दिव्यांग बांधव उपस्थित होते. दिव्यांग असून ही सर्व समस्यसांवर मात करुन जिद्दीने जीवन जगणाऱ्या विशेष व्यक्तींना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अपंग व्यक्तींनी त्यांच्या व्यथा तसेच त्यांच्या मागण्या मांडल्या. गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी दिव्यांगांचे प्रश्‍न लवकरच मार्गी लावले जातील, असे आश्‍वासन दिले.
सरकारने दृष्टिहीन व दिव्यांगांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. दिव्यांगांनी निराशाच्या वातावरणात न राहता स्व:ताचे छोटे-छोटे व्यवसाय उभारुन उपजिवीकेचे साधन तयार केले पाहिजे. त्यांचे सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी आवश्‍यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्‍वासन आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांनी व्यक्त केले. यावेळी गुलाब वळसे पाटील, डॉ. सुहास कहडणे, ज्ञानेश्‍वर धुमाळ, वैशाली पोहकर, कैलास गायकवाड, ललिता बोऱ्हाडे, माणिक हिंगे समवेत अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर टाव्हरे यांनी केले तर दिपक ढोबळे यांनी आभार मानले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)