दिव्यांगनाने केला टीव्हीला अलविदा

“वीरा- एक वीर की अरदास’ या गाजलेल्या मालिकेतील हिरोईन दिव्यांगना सुर्यवंशी आता टीव्हीवरच्या मालिकांमध्ये काम करणार नाही. तिने टीव्ही करिअरला अलविदा केला आहे. कारण तिला आता आपल्या करिअरला अधिक व्यापक करायचे आहे. त्यासाठी सिनेमात जाण्याचा तिचा प्रयत्न आहे. दिव्यांगनाने “वीरा…’नंतर 2015 साली “बिग बॉस’मध्येही सहभाग घेतला होता. त्याशिवाय इतर काही छोट्या मोठ्या रोलमध्येही ती दिसली होती.

वयाच्या सातव्या वर्षापासून ती टीव्ही शोमध्ये सहभागी होत आली आहे. “बिग बॉस’च्या निमित्ताने तिला सलमानशी ओळख करून घेण्याची संधी मिळाली. त्यानेच तिच्या डोक्यामध्ये सिनेमात जाण्याची कल्पना घुसवली हे उघड आहे. सलमानच्याच सांगण्यावरून दिव्यांगनाने केस देखील अगदी छोटे कापले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून ती टीव्ही शोपासून दूर दूर रहात होती. त्याचे कारण तिने आता सांगितले आहे. टीव्ही शोबद्दल आपल्याला आता काही प्रेम वाटत नाही, असे नाही. टीव्ही शो कधीही करता येतील, पण सिनेमासाठी प्रयत्न करायचा तर थोडा ब्रेक घ्यायलाच पाहिजे. एकदा सिरीयल स्वीकारली तर सिनेमासाठी वेळ काढणे जमणार नाही. आणि सिरीयलच्या कमिटमेंटवरही त्याचा परिणाम होईल. सिनेमाच्या करिअरकडे थोडे गांभीर्याने बघायचे असेल, तर सिरीयलपासून आपले लक्ष थोडे हटवले पाहिजे. शिवाय जर टीव्हीवर फार दिसल्यास सिनेमासाठी ऑफर कमी येण्याची शक्यलता असते, असे ती म्हणते.

दिव्यांगनाला सिनेसृष्टीमध्ये फार ओळखींची मदत झाली नाही. त्यासाठी तिला खूप झगडावे लागले. आतापर्यंत तिने तीन सिनेमे साईन केले आहेत. त्यातील दोन चक्का गोविंदाबरोबर आहेत. त्यातील एक “फ्रायडे’ पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. त्यामध्ये तिच्याबरोबर गोविंदा आणि वरुण शर्मा असणार आहेत. सलमान खानच्या रूपात आपल्याला एक चांगला मेंटोर मिळाल्याचे ती सांगते. पण त्याच सलमान सरांकडून तिला कोणत्याच सिनेमात काम करण्याची ऑफर मिळालेली नाही. तिला मात्र सलमान सरांबरोबर काम करण्याची खूप इच्छा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)