दिव्यांकाचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल

‘ये है मोहब्बते’ या हिंदी मालिकेतील इशिता भल्लाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. दिव्यांकाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती एका एलियनसोबत डान्स करताना दिसत आहे. एका अॅपच्या माध्यमातून ‘डेम टू कोसीता’ या गाण्यावर ती नाचत आहे. तिने या व्हिडीओसोबत मी लंडनला जाण्यासाठी तयार आहे परंतु जोपर्यंत या एलियनसोबत काम करत नाही तोपर्यंत एलियन मला सोडणार नाही, अशी कॅप्शन दिली आहे.

जगभरात सर्वत्र एलियन बरोबर डान्स करण्याचा ट्रेंड तयार होत आहे. सेलिब्रेटींसह अनेक सामान्य नागरिकही एलियनसोबत डान्स करताना दिसतात. दिव्यांकाचा हा व्हिडीओ ४४ लाख लोकांनी पहिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)