दिवाळी हंगामामुळे महाबळेश्‍वर फुलले

महाबळेश्‍वर ः वेण्णा लेक परिसरात पर्यटकांनी केलेली गर्दी.

सलग सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटक दाखल; विविध पॉईंटस्‌वर गर्दी
महाबळेश्वर, दि. 9 (प्रतिनिधी) – दिवाळी हंगामामुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहे. हिरवाईने नटलेले महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य पाहण्यात पर्यटक मश्‍गुल झाले आहेत. दिवाळी व सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटक या निसागरम्य नगरीत दाखल होत आहेत.
दिवाळी हंगामामुळे महाबळेश्वर गजबजले असून येथील पर्यटनासाठी प्रसिद्ध केट्‌स पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट,लॉडवीक पॉइंट, सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉइंट, सूर्यास्तासाठीचा प्रसिद्ध मुंबई पॉइंट.. सह लिंगमळा धबधबा या प्रेक्षणीयस्थळांवर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. येथील थंड हवेसोबतच निसर्गसौंदर्याचा पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत. येथील मुख्य आकर्षण असलेले नौका विहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला असंख्य पर्यटक वेळ घालवताना दिसत आहेत. येथे नौकाविहारासोबतच घोडेसवारी,गेम्सची धूम वेण्णालेक वर सुरु असून जणू “जत्रे’ चाच “माहोल’असल्याचे वातावरण आहे. तर खवय्यांसाठी स्ट्रॉबेरी पासून बनविलेली विविध खाद्यपदार्थ,गरमागरम मका कणीस, फ्रॅंकी, पॅटिस, पाणीपुरी, भेळ, पावभाजी या व अशा पदार्थांवर ताव मारताना पर्यटक पहावयास मिळत आहेत. वेण्णालेक येथे पर्यटकांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी येथील मुख्य बाजारपेठा सजल्या असून मोठ्या प्रमाणावर पर्यटक खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल, चणे, प्रसिद्ध फज खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. बाजारपेठेतील आकर्षक वस्तू खरेदीकडे पर्यटकांचा कल असल्याचे पाहावयास मिळत आहे. येथे येणारे पर्यटक सध्या गावाबाहेर झालेले हॉटेल्स बंगलो लॉजिंगला राहणे पसंत करीत असून परंपरागत असलेले हॉटेल्स लॉजिंगसच्या धंद्यावर परिणाम होत आहे.काही ठिकणी होणाऱ्या वाहतूक कोंडी पोलीस प्रशासन स्वतंत्र वाहतूक शाखेच्या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वतः लक्ष घालून प्रयत्नशील असल्याचे पाहावयास मिळत आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)